पत्नीने पतीला गॅलरीतून दिले ढकलून सोशल मीडियावरील 'प्रेम' ठरले जीवघेणे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) सोशल मीडियावरील मैत्रीतून जुळलेल्या प्रेमविवाहाचा शेवट धक्कादायक झाल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. पहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न करणाऱ्या पतीला, पैशांच्या वादातून दुसऱ्या पत्नीने चक्क दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून खाली ढकलून दिल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील विशालनगर भागात १० मे रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या
दागिन्यांच्या वादातून घडला प्रकार
आरोपाखाली दुसरी पत्नी प्रियंका रोहिदास पवार-राठोड हिच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव चिंचोली येथील रहिवासी असलेले संदीप धुम्मा राठोड (३४) हा सिडको वाळूज महानगर एकमधील सहारा फ्लाईटमधील फ्लॅट नंबर २ येथे पत्नी वर्षा व मुलगी आरोही यांच्यासह राहतो. तो इलेक्ट्रिक बाइकचे मार्केटिंगचे वेगवेगळ्या कंपनीचे काम करतो. २०२० त्यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियंका पवार
हिच्याशी झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन २०२४ मध्ये दोघांनी एएसक्लब येथे एका फ्लॅटमध्ये लग्न केले. त्यानंतर प्रियंकास तेथील फ्लॅटमध्ये ठेवून फ्लॅटचे भाडे आणि किराणा सामान देत होता. डिसेंबर २०२५ मध्ये राठोड याने प्रियंकाला विशालनगरात भाड्याने फ्लॅट घेऊन दिला. तेव्हापासून ते राहत होते.
संदीप राठोड हा विशालनगरला ९ मे रोजी सायंकाळी फ्लॅटवर गेला होता. त्यांनी किराणा साहित्य, रोख रक्कम तसेच ऑनलाईन पैसे
विवाहेतर संबंधाचा पेच
पीडित व्यक्तीने पहिली पत्नी असतानाही सोशल मीडियावर ओळख झालेल्या प्रियंकाशी प्रेमविवाह केला होता. दोघे विशालनगर परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून खटके उडत होते. वाद विकोपाला गेल्याने हा जीवघेणा प्रकार घडला.
दिल्यानंतर मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी बाहेर गेले. १० मे रोजी मध्यरात्री १ वाजता परत फ्लॅटवर आल्यानंतर त्यांनी जेवण मागितले, मात्र प्रियांकाने जेवण न देता माझ्या आईसाठी १० हजार रुपये द्या अशी मागणी केली. त्यावर राठोड यांनी तिच्याकडे असलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या व सुमारे पावणेतीन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट परत दे, मग मी तुला पैसे देतो असे म्हणाले. त्यामुळे त्यांच्यात भांडण
झाले. संतापलेल्या प्रियांका पवार हिने त्यांना गॅलरीतून पाठीमागून जोराचा धक्का देत खाली ढकलून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या चार बरगड्या तुटल्या असून कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक काळे करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions